अन्यथा उपोषणाचा इशारा – अंकुश घेवडे
चिपळूण : ग्रामपंचायत सावर्डे शासकीय सुट्टी नसताना शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत बंद ठेवण्यात आली. कामकाजाच्या दिनी कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत बंद ठेवत कायद्याचा उल्लंघन केल्याबद्दल तात्काळ कारवाई करावी अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा अंकुश यशवंत घेवडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय कोकण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी व जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि उपविभागीय अधिकारी चिपळूण, गटविकास अधिकारी पंचायत समिती चिपळूण तथा सरपंच/ग्रामविकास अधिकारी चिपळूण यांना दिले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, श्री. घेवडे हे कामानिमित्त ग्रामपंचायत सावर्डे येथे गेले असता ग्रामपंचायत बंद होती. अनेक ग्रामस्थ परत जात होते. शासकीय सुट्टी नसताना ग्रामपंचायत का बंद ठेवली. याबाबत उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना ग्रामपंचायत सावर्डे बंद असल्याचे छायाचित्र व्हाट्सअपवर पाठवले. त्यानंतर गटविकास अधिकारी चिपळूण यांना मोबाईलवर विचारणा केली. ग्रामपंचायत सावर्डे बंद असण्याचं कारण काय? त्याने उत्तर दिले की, आज सुट्टी नाही ग्रामविकास अधिकारी चिपळूणला ट्रेनिंगला आहेत. यानंतर पंचायत समिती चिपळूण विस्तार अधिकारी यांना मोबाईलवर फोन करून ग्रामपंचायत सावर्डे बंद का आहे असे विचारले, यावर अधिकारी म्हणाले की, ग्रामपंचायत बंद ठेवणे चुकीचे आहे. ग्रामपंचायत बंद ठेवता येत नाही. ग्रामविकास अधिकारी यांना तात्काल सांगून कुणाला तरी पाठवून ग्रामपंचायत कार्यालय उघडायला सांगतो. ग्रामविकास अधिकारी यांनी शिपाई याला ग्रामपंचायत उघडायला सांगितले. मात्र ग्रामपंचायत शिपाई सावंत याने कोणतीच जबाबदारी घेतली नाही. त्यांनी वरिष्ठांना सांगून जबाबदार व्यक्तीला पाठवायला सांगितले. यानंतर डाटा ऑपरेटर ग्रामपंचायत इमारतीच्या आवारात आले व त्याने विचारणा करत ग्रामपंचायत बंद आहे. ग्रामस्थ बर्वे यांना जन्म नोंदणी करायची होती. मात्र डाटा ऑपरेटर यांनी बाहेरच अर्ज देण्यास सांगितले. ग्रामस्थ बर्वे म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालय उघडा. मी कार्यालयात अर्ज देतो येथे रस्त्यावर अर्ज कसा देणार, त्यावर डेटा ऑपरेटर रागात म्हणाले, अर्ज द्यायचा असेल तर इथे द्या, नाहीतर मी निघालो आज सुट्टी आहे. ग्रामपंचायत बंद आहे. आज ग्रामपंचायत उघडणार नाही असे बोलून एका मुलीला स्कूटरवर बसवून निघून गेले. यानंतर ग्रामपंचायत शिपाई यांनी ग्रामपंचायत कारकून यांना फोन केला. फोनवरच कारकून म्हणाले आज ग्रामपंचायत बंद आहे. मी घरी आहे. त्यांना सोमवारी सकाळी यायला सांगा माझ्याकडे काही गाडी नाही त्यामुळे मी येऊ शकत नाही. श्री. घेवडे यांनी उच्च पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यास सांगितले. ग्रामपंचायत कार्यालय उघडेल्यानंतर थोड्याच वेळात महसूल सेवक व कोतवाल हे त्यांच्या कार्यालयीन कामकाजा करिता आले. त्यानंतर ग्रामस्थ अहमद खोत दापोली येथून ग्रामपंचायतीत आले. ग्रामपंचायत बंद ठेवून मनमानी करणारे हम करो से कायदा करणारे पदाचा गैरवापर करून ग्रामस्थांना वेठीस धरणारे ग्रामपंचायत कार्यालयात हालचाल नोंदवही व तक्रार पुस्तिका न ठेवत नियमाचा उल्लंघन करत आहेत. तसेच ग्रामपंचायत सरपंच या शाळेत शिक्षिका असून त्या सरपंच कशा? त्याची सविस्तर चौकशी व्हावी, चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई आदेश पारित व्हावेत, उपरोक्त नमूद अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी लोकशाही मार्ग अवलंबून आमरण उपोषणास बसणार आहोत, असा इशारा श्री. घेवडे व सावर्डे ग्रामस्थांनी यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपले कार्यालय जबाबदार राहील असेही या निवेदनात नमूद केले आहे.













