वेंगुर्ले : दाजी नाईक
कै.नीरज कोरगावकर यांच्या स्ममरणार्थ रामपुरुष युवा मित्र मंडळ तर्फे सलग १६ व्या वर्षी शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या रक्तदान शिबीरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
ना राजकारण फक्त समाजकारण. हा मंत्र घेऊन लोकांचा जीव वाचावायला हवा या उद्देशाने मंडळाने या रक्तदान शिबिराला सुरवात केली. दरम्यान आज सकाळी कै.नीरज कोरगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, जिल्हा परिषद माजी सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, तिरोडा सरपंच प्रिंयाका सावंत, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, शिरोडा माजी उपासरपंच दत्तगुरु परब, शिरोडा सदस्य पांडुरंग नाईक, शिरोडा माजी ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब, डॉ. प्रसाद साळगावकर, रेडी ग्रामपंचायत सदस्य नामदेव राणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि परबवाडा ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँक मार्फत हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात आले. शिबिरात सहभाग घेतलेल्या सर्व रक्तदाते, मान्यवर, ग्रामस्थ यांचे रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा परबवाडी यांनी आभार मानले.













