देवरूखचे वनपाल सागर गोसावी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल
देवरूख:
रत्नागिरी नागपूर महामार्गावरील करंजरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी, दाभोळेचे वनरक्षक सुप्रिया काळे, साखरपा वनरक्षक सहयोग कराडे, फुणगूस वनरक्षक आकाश कडुकर, आरवली वनरक्षक सुरज तेली आदिंनी तात्काळ घटनास्थळी जावून मृत सांबराची पाहणी केली व पंचनामा केला. पुढील कार्यवाही वनविभागाकडून सुरू आहे.











