सर्जेकोट मिर्याबांदा शाळेस बलभीम मंडळाकडून संगणक भेट ▪️मुख्याध्यापक श्रीकृष्ण बागवे यांनी मानले आभार मसुरे | झुंजार पेडणेकर जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा या प्रशालेस बलभीम मंडळाच्या सदस्यांनी संगणक संच भेट दिला. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे. आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे बालवयात मिळावे. ही काळाची गरज ओळखून बलभीम मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येऊन हा संगणक संच भेट दिला आहे. शाळेप्रति आपले प्रेम असेच कायम ठेवा असे आवाहन मुख्याद्यापक श्रीकृष्ण बागवे यांनी केले. संकष्टीचे औचित्य साधून बलभीम मंडळाचे सदस्य श्री.ज्ञानेश्वर पराडकर, श्री.रत्नखचित आडकर, ॠषीकेश सावंत, युवराज आडकर, श्री.केशव आचरेकर,श्री. स्वप्नील केळुसकर यांनी मुख्याध्यापक श्री.श्रीकृष्ण बागवे यांचेजवळ संगणक सुपूर्द केला. मुख्याध्यापक श्रीकृष्ण बागवे यांनी आभार मानले.












