मसुरे | झुंजार पेडणेकर : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेतील नवोदय परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत सराव चाचणी घेण्यात आली. मालवण तालुक्यातील नवोदय परीक्षेस 140 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.मालवण तालुक्यातील ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे राज्य उपाध्यक्ष प्रशांत पारकर, उपाध्यक्ष श्री.रामदास तांबे,उपाध्यक्ष श्री. अमर वाघमारे, श्री.देविदास प्रभुगांवकर,माजी अध्यक्ष श्री.गुरुनाथ ताम्हणकर, श्री.गणेश सुरवसे, श्री.शामसुंदर सावंत, श्री.सुनिल सावंत,श्री.समीर चव्हाण, परशुराम गुरव, श्री.उदय गोसावी सल्लागार मान.श्री.प्रमोद गोसावी ,श्री.राजेंद्र परब व सदस्य तसेच महिला सेल अध्यक्ष, व सर्व सदस्य ,केंद्रप्रमुख या सर्वांचे आभार राज्य उपाध्यक्ष प्रशांत पारकर,तालुका अध्यक्ष श्री.श्रीकृष्ण बागवे, सचिव श्री. नारायण, पराडकर यांनी मानले.











