नागपूर; शासनाच्या पोर्टलवर ई पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी लक्षात घेता ई पिक नोंदणीला मुदत वाढ दिली आहे याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
शासनाने जरी ई पिक नोंद करण्यास मुदतवाढ दिली तरी यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची ई पिक नोंदणी रखडली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शासकीय दरात भात विक्री करतेवेळी सन २०२५/२६ पिकाची नोंद न झाल्याने शेतकऱ्यांना ई पीक नोदणी करीता शासनाच्या पोर्टलवर ई पीक नोंदणी करताना अडचणी निर्माण होत आहे. या साठी मुदत वाढ 15 डिसेंबर पर्यंत दिली आहे सुरळीत होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याकरीता ई पिक नोंदीची साठी शासनाकडुन मुदत वाढ मिळवून देणे साठी फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटी लि.चे चेअरमन राजन नानचे यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये घेत असलेल्या पिकाची नोंद शासनाने ई पिक पाहणी म्हणुन विकसित केलेल्या मोबाईल अॅप वरुन करणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्याने तो जमिनीमधुन घेत असलेल्या भात पिकाप्रमाणे त्याची नोंद न केल्यास त्याला शासकीय दराने भात विक्री करतेवेळी भात विक्री करीता नोंदणी होणार नाही चालु वर्षी ई पिक नोंद करतेवेळी शेतकरी प्रत्यक्ष बांधावर गेला तरी शासनाच्या मोबाईल अॅपवर हे ठिकाण प्रत्यक्ष ठिकाणापासुन २ ते ३ कि.मी.दूर दर्शविले जाते त्यामुळे शेतकरी आपल्या पिकाची मुदतीमध्ये नोंद सप्टेंबर २०२५ पर्यंत करु शकलेले नाहीत. मात्र त्यानंतर शासनाकडुन नेमलेल्या सहाय्यकांकडुन नोंद करण्यास एक महिना मुदत वाढ देण्यात आली होती मात्र त्यांच्याकडुनही नोंद करतेवेळी तशाच स्वरुपाच्या अडचणी उद्भवल्या. त्यामुळे पिकांची नोंद होवू शकली नाही.
याबाबत वेळोवेळी तलाठी कार्यालय फोंडाघाट यांना कळविण्यात आले. मंडळ अधिकारी फोंडाघाट, तलाठी फोंडाघाट व तहसील कार्यालयातील तांत्रिक सल्लागार बाजीराव काशिद यांनीही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन दिनांक ५/११/२०२५ रोजी पाहणी केली. मात्र या अडचणी त्यांच्याही निदर्शनास आढळुन आल्या. शासनाने जरी ई पिक नोंद करण्यास मुदतवाढ दिली तरी तांत्रिक अडचणींचे निवारण न झाल्यामुळे शेतकऱ्याची ई पिक नोंदणी होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासकीय दरात भात विक्री करतेवेळी सन २०२५/२६ ची खरीप हंगाम पिकाची नोंद न झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक नोंदणी करताना शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करतेवेळी अडचणी निर्माण होत आहे.
यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या माध्यमातुन जसा फळपिक विम्याकरिता ई पिक पाहणीला मुदत वाढ करण्यासाठी कृषीआयुक्त, (पुणे) यांचेकडून अप्पर मुख्य सचिव (कृषी) महाराष्ट्र शासन यांना पत्र व्यवहार केला होता व फळ पिक विम्यासाठीची ई पिक नोंदिला मुदत वाढ मिळावी तसेच आवश्यक ते प्रयत्न करून त्यांनी शासनाकडून ई पिक नोंदीची ला मुदत वाढ करून घ्यावी, अशी मागणी फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटी लि.चे चेअरमन राजन नानचे यांनी केली होती.









