अध्यक्षपदी शशांक रेडीज,सचिवपदी तुषार दिवेकर
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षपदी श्री शशांक रेडीज यांची निवड झाली असून सचिव पदी श्री तुषार दिवेकर तसेच खजिनदारपदी श्री मकरंद सोलकर यांची निवड झाली. रोटरी क्लब ऑफ लोटे चा पदग्रहण सोहळा नुकताच लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूलच्या सभागृहात पार पडला.यावेळी रोटरी वर्ष २०२४-२५ करिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इव्हेंट रोटेरियन अशोक नायक,असिस्टंट गव्हर्नर डॉक्टर उपेंद्र तलाठी, रोटरी क्लब ऑफ खेड अध्यक्ष गांधी, रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष रोटेरियन अविनाश पालशेतकर, रोटेरियन विवेक रेळेकर, रोटेरियन बिपिन पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते. डिस्टिक गव्हर्नर इव्हेंट रोटरीन अशोक नायक यांनी इन्स्टॉलिंग ऑफिसर ची भूमिका पार पाडत नूतन अध्यक्ष रोटेरियन शशांक रेडीज यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. मावळते अध्यक्ष रोटेरियन श्री कुंदन मोरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे शशांक रेडीज यांचे कडे सुपूर्द केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन संकेत देवरुखकर यांनी केले.








