बांदा : प्रतिनिधी
मडूरा रेल्वे स्टेशन नजीक आज सायंकाळी मंगला एक्सप्रेसच्या धडकेत सावंतवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाला. दीपक पाटकर उर्फ बेडूक भाई असे त्याचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला. रेल्वेची तडक इतकी जोरदार होती की त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगला एक्सप्रेस चालकाने मडूरा स्टेशन मास्तरांना याबाबत माहिती दिली. बांदा पोलीस कॉन्स्टेबल राजेश गवस व हळदे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह हलविण्याच्या कामी मडूरा सरपंच उदय चिंदरकर, पोलीस पाटील नितीन नाईक यांनी पोलिसांना सहकार्य केले. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.










