इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांचे तर्फे देवगड येथे वैद्यकीय शिबिर संपन्न

देवगड दिनांक 19

देवगड मेडिकल फाउंडेशन डॉआठवले कॅम्पस येथे 19 जुलै 2023 रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळात इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी यांचे तर्फे एक वैद्यकीय शिबिर संपन्न झाले .ह्या शिबिरात नेत्र पटेल तपासणी तज्ञांमार्फत सुमारे 85 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यांना मधुमेह आहे, ज्यांचे वय 40 वर्षे पेक्षा अधिक आहे त्यांना नकळत डोळ्याच्या काही समस्या उद्भवू शकतात.

मोतीबिंदू असणे, अचानक नजर कमी होणे पडदा सरकणे डोळ्यातील प्रेशर वाढणे पडद्याला सूज येणे व छिद्र पडणे, डायबिटीस मध्ये दृष्टी कमी होणे ,अशा रुग्णांची तपासणी करण्यात आली,तर आधुनिक यंत्राद्वारे ओसिटी ही तपासणी अल्प दलात करण्यात आली .संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वात मोठे डोळ्यांच्या हॉस्पिटलचे नेटवर्क असून अनेक नेत्रतज्ञ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. भविष्यात इंफिगो आय केअर हॉस्पिटल तर्फे असेच लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे हॉस्पिटल तर्फे जाहीर करण्यात आले.