साटमवाडी येथील विहीर कोसळली
देवगड प्रतिनिधी
देवगड मध्ये शनिवारी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला.पाऊस सुरू झाले नंतर प्रथमच पावसाने १५० चा टप्पा ओलांडला असून रविवारी सकाळी १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसाने देवगड साटमवाडी येथील विहीर कोसळली असून यामुळे विहिरी शेजारून जाणारा रस्ताही खचण्याची भीती व्यक्त होत आहे. कावलेवाडी मार्गावर झाड पडल्याने एक तास वाहतूक ठप्प होती.
देवगड तालुक्यात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.या या पावसामुळे कावलेवाडी रोडवरील खान यांच्या दुकानात शेजारील असलेले झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने रात्री अकरा वाजल्यापासून वाहतूक ठप्प होती. सकाळी नगरसेविका स्वरा कावळे यांनी नगरपंचायत मध्ये याबाबतची माहिती दिल्यानंतर नगरपंचायत कर्मचारी यांनी तात्काळ तिथे येऊन ते झाड हटविले व मार्ग वाहतुकीस खुला केला.
देवगड साटमवाडी येथील दत्ता जोशी यांच्या कंपाउंड मधील विहिरीचा काही भाग कोसळल्याने विहिरी नजीक असलेल्या रस्ता ही खचण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे .
रविवारी मात्र पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती.









