कणकवली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हयात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलैला वाढदिवस आहे.
याबाबत बोलताना प्रफुल्ल सूद्रिक म्हणाले, अजित पवार यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हयात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा उपक्रमानी सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करत असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे राज्यासह आपल्या सिंधुदुर्ग जिल्हाचा सर्वागीण विकास होणार आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी भरघोस निधी दिला होता. अशा नेत्याचा वाढदिवस तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यासाठी युवा वर्ग सरसावला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवितानाच वृक्ष संवर्धन काळाची गरज ओळखून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्ष वाटप, वृक्ष लागवड, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच आरोग्य शिबिर अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.











