Pune Airport : पुणे विमानतळावरून ९४ विमानांच्या फेऱ्या अचानक रद्द; जाणून घ्या कारण

भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट विमानाचे लँडिंग करत असताना विमानाचा गिअर बिघडला असल्याने धावपट्टीवर विमान अतिशय जोरात आदळले आणि सगळीकडे आगीचे लोट पसरले. या हार्श लँडिंगमुळे धावपट्टीच्या पृष्ठभागाचे नुकसान झाले. सुदैवाने पायलट सुरक्षित आहे, मात्र धावपट्टी खराब झाल्याने ती इतर विमानांच्या बाबतीत धोकदायक ठरू शकते याच गोष्टीची दक्षता घेत उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

या कंपन्यांहूची विमाने रद्द ?

धावपट्टी बंद असल्याने विविध विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडिगो : सर्वाधिक फटका इंडिगोला बसला असून ३७ विमाने रद्द करण्यात आली आहेत.

एअर इंडिया : ६ विमाने रद्द एअर इंडिया एक्सप्रेस : १० विमाने रद्द स्पाइसजेट : ३ विमाने रद्द याव्यतिरिक्त इतर अनेक विमाने सुरत, गोवा आणि मुंबईकडे वळवण्यात आली आहेत.

इंडिगोचे प्रवाशांसाठी सोयी

विमान रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रवाशांना विमानाचे अपडेट्स देत असून ज्यांची विमान रद्द झाली आहेत, ते प्रवासी प्लॅन बी अंतर्गत फ्लाईट निवडू शकतात. किंवा पूर्ण परतावा घेऊ शकतात. इंडिगोने ट्विट करत याची संपूर्ण माहिती दिली आहे.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले

शिवाय केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत धावपट्टी लवकरात लवकर सुरळीत करू काम युद्धपातळीवर सुरु आहे सुरक्षित धावपट्टी होईपर्यंत नागरिकांना आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.