दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘भूमी सावंत’ला निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक!

दोडामार्ग: दोडामार्ग शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ एम. आर. नाईक विद्यालय, कोनाळकट्टा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक ९ डिसेंबर २०२५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित या प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या प्रदर्शनातील माध्यमिक स्तर निबंध स्पर्धेमध्ये श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथील विद्यार्थिनी भूमी हनुमंत सावंत हिने विशेष प्रावीण्य मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. भूमी सावंतला मिळालेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भूमि सावंतला हे प्रशस्तिपत्रक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. तिच्या या चमकदार कामगिरीबद्दल एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टाचे मुख्याध्यापक, पंचायत समिती दोडामार्गचे गटशिक्षणाधिकारी, तसेच संयोजक आणि श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथील शिक्षक व व्यवस्थापनाने अभिनंदन केले आहे.

विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन एम.आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.