तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार
बांदा (प्रतिनिधी): गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि निगुडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने निगुडे येथे रविवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निगुडे जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथे सदर शिबीर आहे.
या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ॲलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडांचे व सांध्यांचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, पचन, घसा, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाईल. तसेच तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधेही देण्यात येणार आहेत.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी निगुडे ग्रामपंचायत पदाधिकारी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ. प्रशांत ससाणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्याशी (९४०४१४४७५८) संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.











