

प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस असल्यानं प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला. कणकवलीतील नदी नाले तुडुंब भरून वाहताना दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी काहीशी पूर सदृश्य स्थिती देखील निर्माण झाली आहे. वातावरणात नेहेमीपेक्षा अधिक बदल देखील जाणवत असून अतिवृष्टीमुळे प्रशासनाकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी पाऊस जास्त प्रमाणात असेल तर घराबाहेर पडू नये तर मोठ्या झाडांच्या तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी राहू नये असा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच आपत्तीजनक काही जाणवल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन समितिशी संपर्क साधण्याच आवाहन देखील करण्यात आलं आहे.












