सावंतवाडी : सातार्डा तरचावाडा येथील रहिवासी योगेश मनोहर मांजरेकर (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर सातार्डा वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. योगेश मांजरेकर हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित होते. बाजारपेठेतील मांडावर श्री गणेशोत्सवात गाऱ्हाणे घालणारे मकरंद मांजरेकर यांचे ते बंधू होत.












