शासनाच्या आरोग्य सेवेचा महीलांनी लाभ घ्यावा – डॉ. अनुराधा बिराजदार 

करुळ येथे स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ 

वैभववाडी l प्रतिनिधी :         देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्थ नारी – सशक्त परिवार हे अभियान सुरू होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या विविध तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. गावागावातील प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिरात ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व महिलांनी या आरोग्य सेवेचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा बिराजदार यांनी केले आहे.

करूळ येथे स्वस्थ नारी – सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ पार पडला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान सुरू रहाणार आहे. याचे औचित्य साधून ग्रामपंचायत करूळ व आयुष्यमान आरोग्य मंदिर करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात मधुमेह तपासणी, एचबी तपासणी, इसीजी, व विविध तपासण्या व उपचार करण्यात आले.

तसेच नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड व वयवंदना कार्ड काढून देण्यात आली.

यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, तालुका आरोग्य सहाय्यक आनंद चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुप्रसाद महेंद्रकर, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, आरोग्य कर्मचारी नूतन जांभवडेकर, नितीश पाटील, शुभम राठोड, अतिफा चोचे, अशरफ तांबोळी, धनश्री देसाई, श्रावणी कांबळे, नम्रता कविटकर, फाल्गुनी जाधव, प्रतीक्षा कोलते, नम्रता वळुंजू व जान्हवी पांचाळ आदी उपस्थित होते.