सायकलस्वार अजित दळवी यांचा नागरिकांतर्फे सत्कार
तब्बल २८ राज्यांची ८६ दिवसांत परिक्रमा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सायकल भ्रमंती करून २८ राज्य फिरून शहिदांना सलामी देणाऱ्या सायकलस्वार अजित पांडुरंग दळवी यांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व केशवसुत कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिकांकडून सत्कार करण्यात आला. गगनबावडा कोदेगाव जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या अजित दळवी यांनी
सदर प्रवास त्यांनी २६ सप्टेंबर पासून सुरुवात केला होता. या साठी त्यांनी पंधरा हजार किलोमीटर प्रवास ८६ दिवसात पूर्ण केला. दळवी हे सेमी गव्हर्मेंट इंडियन नेव्ही माजगाव डॉट शिप बिल्डर्स लिमिटेड या कंपनीमध्ये सेवेत आहेत.
देशाबद्दल अफाट प्रेम व शहीद जवानांबद्दल खूप आदर असल्याकारणाने ते कामावर सुट्टी घेऊन कर्मचारी व मित्रमंडळी कडून पैसे जमा करून ही सायकल भ्रमंती त्यांनी मुंबईतून सुरू करून त्याचा शेवट गोवा येथे केला. त्या भ्रमंतीसाठी त्यांना जवळपास एक लाख रुपये खर्च आला.
या भ्रमंतीदरम्यान ठिक ठिकाणच्या राज्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला होता. आज या गांधी चौक सावंतवाडी तालुका रिक्षा संघटना आयोजित कार्यक्रमांमध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच मोती तलाव येथील केशवसुत कट्ट्यावर या शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांच कौतुक व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुधीर पराडकर ,ओमकार पराडकर, ज्येष्ठ वकील बापू गव्हाणकर, प्रदीप प्रियोळकर, विनायक कोडल्याळ धर्मेंद्र सावंत, जयवंत टकसाळ, सुभाष तावडे, महादेव बामणे प्रा. एम व्ही कुलकर्णी, दत्तप्रसाद गोठोसकर , मधुकर घारपुरे सुरेश मस्कर प्रदीप, ढोरे ,मुकुंद वझे, श्याम भाट, विश्वास जोशी, प्रा. गोडकर व रवी जाधव उपस्थित होते.












