प्रदीप केटरर्सचे मालक प्रदीप श्रीपाद सुकी यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी वैश्यवाडा येथील रहिवासी व प्रदीप केटरर्सचे मालक प्रदीप श्रीपाद सुकी यांचे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. कॅटरिंग साठी भांडी भाड्याने देणे, तसेच कोकम, अननस सरबत यांची घावुक विक्रीचा ते व्यवसाय करत. माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, प्रकाश सुकी, दिवाकर सुकी, मिलिंद सुकी यांचे ते भाऊ तर सावंतवाडी वैश्य समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. विद्या सुकी, माजी नगरसेविका सौ.शुभांगी सुकी यांचे ते दिर होत. तर धीरज व गजानन सुकी यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी दीपा, मुलगा अक्षय तसेच भाऊ, वाहिन्या, पुतण्या असा मोठा परिवार आहे. सायंकाळी ५ वाजता अंत्यविधी होणार आहेत.