नेमळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Google search engine
Google search engine

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग आयोजित क्रिडा संकुल ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.१४ वर्षाखालील मुलांच्या गटात सोहम राजन मडवळ या विद्यार्थ्यांने गोळा फेक स्पर्धेमध्ये ९.५५ मि.गोळा फेक करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.पांडुरंग संताजी पाटकर या विद्यार्थ्यांने थाळी फेक स्पर्धेमध्ये २७.७२ मि.थाळी फेकून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी या दोन विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्द्ल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ ,प्राचार्या कल्पना बोवलेकर ,माजी प्राचार्य किरण वेटे ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक आर के.राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.