केईएम रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांना तीन वर्षांत पुरवले २४,००० मोफत टिफिन

सदिच्छा फाउंडेशनच्या माध्यमातून सचिन गुंड्ये व सहकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

संतोष कोत्रे
लांजा-: गेल्या तीन वर्षांपासून सदिच्छा फाउंडेशनच्या या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र सचिन गुंड्ये यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड,पालघर या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना तीन वर्षांत २४,००० मोफत टिफिन पुरवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सचिन गुंडये हे व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकदा केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि आपल्या गावाकडील आणि विशेषता कोकणातील गोरगरीब जनतेची जेवण खाण्यापासून होणारी हेळसांड त्यांनी पाहिली होती. आणि अशांसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी सुरुवातीला केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना स्वखर्चाने मोफत टिफिनची पुरवण्याचे काम सुरू केले .मात्र आपला काम धंदा, व्यवसाय सांभाळून या सर्व गोष्टी करणे सहज सोपे नव्हते. म्हणूनच त्यांनी सदिच्छा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
या संस्थेच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हळूहळू आपल्या या कामाचा व्याप वाढवला. सचिन गुंडये आणि सहकारी यांच्या हे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू असलेले काम लक्षात घेऊन आजवर अनेकजण आर्थिक मदतीसाठी पुढे येत असतात. गेल्या तीन वर्षांत सदिच्छा फाउंडेशन या संस्थेने केईएम रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना २४ हजार हून अधिक मोफत डबा पुरवण्याचे काम केले आहे.
गोरगरीब रुग्णांचे आशीर्वाद आपल्याला आणि सदिच्छा फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी तारणहार ठरतील असे स्पष्ट मत सचिन गुंडये यांनी व्यक्त केले. दरम्यान सदिच्छा फाउंडेशनच्या या कामात अध्यक्ष सचिन गुंड्ये यांच्यासह मनीष सावंत ,स्वप्नश्री शिंदे,कांचन भोसले,प्रवीण साळुंखे,संतोष बावकर,महेश गुंड्ये,अजिंक्य नेमन,विक्रांत वारीशे,रुपेश बराम, राम वाडकर,संजय गुंड्ये,श्रुती खेडेकर,विजय गावडे,स्वप्नील घारे ,विनिता कदम ,महेश गावडे,जनार्दन गावडे, नेहा मालकर, प्रफुल राऊत, पुरुषोत्तम वेतकर,श्रेयस सावंत, दत्ता शिर्के , मेहेंद्र आंग्रे,सुदिन सुवारे, संजय पालकर, प्रदीप कुंभार,संतोष चव्हाण ,पप्पू गोरे, संजय खेतल,मंगेश तांबे,प्रवीण पतयान,दिनेश किनी,अमित शेलार,अंकुश मेस्त्री,संदेश गुरव ,निलेश सकपाळ,तरुण दास,मीनाक्षी राठोड,अशोक कसपले,अभिषेक कस्तुरे, ओंकार पाटोले, अस्मिता देसाई,सुषमा जाधव ,ज्योती पवार,संतोष सावंत,विश्वनाथ मांडवकर, हितेंद्र जोशी, परेन पाटणकर,जगन भोसले,अक्षय आडिवरेकर,अमर कराडकर,किशोर तावडे,माधुरी माळगावकर,ललित चव्हाण,मोनिका घेवडे, प्रणाली इचके , प्रणिल भोसले,संतोष कोट्रे शशांक परब,शैलेश पुजारी, सुमित घरत,विलास चिले,विलास परब ,विश्राम सावंत,विनायक वाडेकर,अमिषा मर्गज, किरण राऊत, स्वयम् पोवार, श्रीकांत कुंभार, कैलास तांडेल, मनोहर मोरे, संकेत गोरेगावकर , वीणा घाडीगावकर , प्रज्वल घरत, अक्षय ढवळे, कल्पेश जाधव ,कैलास तांडेल,अक्षय निकम ,अक्षय चव्हाण .प्रवीणव पालव,मितेश किणी, हेमलता शिसुवन.
विशेष सहकार्य: आनंद तरे (संस्थापक अध्यक्ष – शिवसंग्राम ग्रूप), गीता तरे,तनुजा घरत, दिलीप तरे आदींचे सहकार्य लाभले आहे.