ओटवणे (प्रतिनिधी ) श्री शिव छत्रपती माध्य. विद्यालय असनीये या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 19 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे.वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्यात विविध कला गुणांनी नटलेला “रंगबहार ” हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन असनीये विद्यालयाचे संस्थापक एम. डी. सावंत यांच्या हस्ते होणार आहे.मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध कला गुणदर्शक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याच बरोबर मुलांनी अनेक स्पर्धा तसेच परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष विशाल परब असणार आहेत तर प्रमोद कामत (माजी शिक्षण, आरोग्य सभापती ),श्वेता कोरगावकर (महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ),आदिसह असनीये सरपंच रेश्मा सावंत, कृषी सहाय्यक मिलिंद निकम,मुकुंद परब (ग्रा. वी. अधिकारी तिरोडा ),याच बरोबर शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कमिटी सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच, मान्यवर आदि उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच आवाहन मुख्याध्यापक जान्हवी सावंत तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित श्री. शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनीये शिक्षक वृंद, पालक शिक्षक संघ आजी माजी विधार्थी,शालेय कर्मचारी, संस्था पदाधिकारी यांनी केले आहे.












