विरण विकास संस्थेकडून गृहपयोगी साहित्य वाटप!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या विरण विकास संस्थेची ७७ वी वार्षिक सभा नुकतीच संस्था अध्यक्ष रामदास पांजरी यांचे अध्यक्षतेखाली व माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या वेळी उपाध्यक्ष पंकज परब, संचालक मोहन घाडीगांवकर, विश्वनाथ परब,बबन परब, दत्ताराम आंबेकर, रामचंद्र झोरे, सुचित्रा सावंत, बाळा परब , सौ.परब , जागृती परब ,सतीश मोहन गावडे, विजय घाडीगांवकर, सुभाष परब, कर्मचारी यांच्या सह संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे कार्यक्षेत्र असलेल्या मसदे, चुनवरे,मालोंड , बेलाची वाडी,वेरळ,राठीवडे,कोईळ,माळगाव येथील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित संस्था पदाधिकारी व सभासद, कर्मचारी यांचे स्वागत संचालक मोहन घाडीगांवकर यांनी केले. संस्थेची आर्थिक उलाढाल व प्रगती दर्शविणारा वार्षिक अहवाल वाचन करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कडील कर्जाची परतफेड मुदतीत करून संस्थेची आर्थिक प्रगती होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. उपस्थित सभासदांच्या सुचने प्रमाणे संस्थेची स्वतःची इमारत, गोडाऊन , खते,बियाणी ,शेती अवजारे, संस्थेने उपलब्ध करून देण्यात यावी व संस्था कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गुणवंत मुलांचा दरवर्षी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. शेवटी संस्था अध्यक्ष रामदास पांजरी, अनिल कांदळकर यांनी मार्गदर्शन केले व मान्यवरांच्या हस्ते सर्व सभासदांना प्रत्येकी ३ कीलो साखर भेट देऊन गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शेवटी संचालक मोहन घाडीगांवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.