शिवकालीन गडकिल्ले बनविणे स्पर्धेत ओम सरफरे, साई सरफरे प्रथम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रा. पं करूळ चे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत करूळच्या वतीने शिवकालीन गडकिल्ले बनविणे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ओम संदीप सरफरे व साई संदीप सरफरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत 12 जणांनी सहभाग घेतला. गडकिल्ल्यांची संपूर्ण माहिती देऊन किल्ले बनवणाऱ्या सर्व स्पर्धकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

स्पर्धेत द्वितीय क्रमांक – आदित्य दीपक गुरव तर तृतीय क्रमांक – ऋतिक नागोजी पांचाळ, ऋषभ जगदीश पांचाळ आणि सत्यवान लक्ष्मण सरफरे यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ मानस दिलीप जामदार आणि आर्यन महेश राऊत, आसावरी महेश राऊत यांना देण्यात आला. विजेत्यांना रोख बक्षीसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. परिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालय करुळचे शिक्षक वैभव पाटील, श्री. जाधव यांनी काम पाहीले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण करूळ सरपंच नरेंद्र कोलते, दत्त देवस्थान मंडळ अध्यक्ष संतोष साटम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी सरपंच हिंदुराव पाटील, उपसरपंच भास्कर सावंत, रवींद्र पवार, विलास गुरव, उदय कदम, संजय कदम, चंद्रकांत पाटील, यशवंत कोलते, सचिन कोलते, बाळासाहेब कोलते आदी उपस्थित होते. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पंचायत राज अभियान संपर्क अधिकारी संतोष टक्के, ग्रामपंचायत शशिकांत गुरव व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.