खेड(प्रतिनिधी) आपत्ती काळात आघाडीवर असलेले खेड मधील मदत गृप चे एक पथक गुरुवारी इर्शाळ वाडीतील दरड दुर्घटनेच्या मदत कार्या साठी रवाना झाले आहेत
खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड दुर्घटनेच्या ठिकाणी मदत करण्यासाठी मदत ग्रुपची टीम गेली आहे.मदत ग्रुप चे अध्यक्ष प्रसाद गांधी,इंद्रकुमार रायका,मनिष भोसले,बंटी आंब्रे, किरण मोगरे. या पथका मध्ये समावेश आहे सामाजिक बांधिलकी जोपासून हे मदत कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले











