दि. १९ डिसेंबर२०२५ रोजी शिवछत्रपती माध्य.विद्या. असनिये येथे शैक्षणिक वर्ष २०२५- २६चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सन्मा. प्रमोदभाई कामत (माजी शिक्षण व आरोग्य सभापती,भाजप जिल्हा उपाध्यक्ष)यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ७.३० वा. संपन्न .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. प्रमोदभाई कामत प्रमुख अतिथी मा.सौ. श्वेता कोरगावकर (महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष,भाजपा) प्रशालेचे संस्थापक मा.श्री.एम.डी.सावंत
यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलान आणि सरस्वती प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.प्रशालेच्या विद्यार्थीनींनी सुरेल अशा ईशस्तवन व स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले, प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी याला सुरेख संगीत साथ दिली.प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सावंत मॅडम यांनी व्यासपिठावरील सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत केले. मा.श्री.एम.डी.सावंत सर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख अतिथी तसेच सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छदेवून यथोचित सन्मान करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून मुख्या.श्रीम. सावंत मॅडम यांनी प्रशालेच्या भौतिक गरजा यावर प्रकाश टाकला. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.राठोड सर यांनी अहवाल वाचनातुन पुर्ण वर्षभरातील प्रशालेत राबवले जाणारे उपक्रम , प्रशालेची शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत प्रशालेस वेळोवेळी लाभणारे सामाजिक दातृत्वाचेही ऋण व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये शालांत परीक्षेत यशस्वी विद्यार्थी तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडास्पर्धा यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक तसेच चषक देवून गौरव करण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थी/विद्यार्थीनी यांची घोषणा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रमोद कामत यांनी केली.यावर्षी कु.अभिषेक धाकु कोळापटे आदर्श विद्यार्थी तर कु.पूर्वा न्हानू सावंत हीची आदर्श विद्यार्थीनी म्हणुन निवड करण्यात आली,त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्रमोद कामत आणि शाळेचे संस्थापक .श्री. एम.डी.सावंत यांनी आपल्या भाषणातुन नवीन शासन धोरणा नुसार शाळा बंद होण्याच्या स्थितीची जाणीव पालकांना करुन शाळा वाचवण्या साठी पालकांनीही पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन केले.यावेळी प्रमुख अतिथी सौ.श्वेता कोरगावकर, मा.श्री. एम.डी.सावंत सर,मा श्री. गुरूनाथ पेडणेकर,मा.श्री.मुकुंद परब,मा.श्री.मिलिंद निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर असनिये सरपंच मा.सौ.रेश्मा सावंत,तांबुळी सरपंच सौ.वेदिका नाईक ,समिती सदस्य श्री. श्री.शांताराम सावंत , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा.श्री. कमलाकर सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालक व माजी विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दुसर्या सत्रात रंगबहार २०२५ या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारा सदाबहार कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.एम.डी.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सरस नृत्याविष्कार, विनोदी/ समाप्रबोधनात्मक नाटिका, गीतांनी उपस्थित सरिकांची मने जिंकली.उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमाची सांगता रात्री 1.45 वाजता येणार्या नविन वर्षाच्या स्वागत नृत्याने केली.यावेळी पालक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री. परेश देसाई सर तर आभार लिपीक श्री जी.बी.सावंत सर यांनी मानले












