जिल्हा परिषद जालना च्या समितीने केली परुळेबाजार ग्रा.पं. च्या विविध उपक्रमांची पाहणी

परुळे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद जालना च्या समितीने परुळेबाजार ग्रा.पं. तीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली.राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जि.प. जालना अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांची टिम नुकतीच परुळे बाजार येथे ग्रा.पं. तीच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी श्री. अंकुश चव्हाण साहेब गटविकास अधिकारी भोकरदन श्री बोडखे( पं ) जाफराबाद गटविकास अधिकारी जिल्हा परिषद जालना, पि पि खिल्लारे विस्तार अधिकारी पं स घनसावंगी जि जालना,समीर जाधव वि.अ. डि ए सोनावणे विस्तार अधिकारी यांसह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आदी उपस्थित होते समितीचे स्वागत उपसरपंच संजय दुधवडकर माजी सरपंच प्रदीप प्रभू यांनी केले. यावेळी ग्रामसेवक शरद शिंदे यांनी माहीती दिली यावेळी समितीने काथ्याप्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया युनीट प्रक्रिया युनीट प्लॅस्टिक कचरा संकलन युनीट,प्रक्रिया संकलन युनीट, अंगणवाडी, शाळा व्यायामशाळा. यांजबरोबर इतर उपक्रमांची माहीती घेतली व विविध उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामपंचायत इमारत व सभागृह पाहून जालना जिल्हा परिषद टीमने आम्ही एखाद्या जिल्हा परिषद ला भेट दिली असे वाटले