वेंगुर्ले नगरपरिषद भाजपकडे

दिलीप उर्फ राजन गिरप नगराध्यक्षपदी विजयी

भाजप १५, उबाठा ४ व १ शिवसेना

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे दिलीप उर्फ राजन गिरप हे ४३१ मतांनी विजयी झाले आहेत. एकूण वीस नगरसेवक पदाच्या जागांपैकी १५ जागांवर भाजपाने विजय मिळवला. तर ४ जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडे तर एक जागा शिवसेनेने मिळवली आहे.