सावंतवाडीत भाजपचा दणदणीत विजय

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १३६४ मतांनी विजयी

भाजपचे ११ नगरसेवक विजयी

शिवसेना ७ तर काँग्रेस १ व उबाठा १

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय संपादित केला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत – भोंसले यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार ॲड. नीता कविटकर यांचा १३६४ मतांनी पराभव केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे एकूण ११ नगरसेवक विजयी झाले. तर शिवसेना ७ , काँग्रेस १ व उबाठा चा १ नगरसेवक विजयी झाला.