नगराध्यक्षा पदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी
हा जनतेचा विजय : आ. निलेश राणे
जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांसह शिवसेनेचे दहा विजयी नगरसेवक व शिवसैनिकांचा जल्लोष
मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर या सुमारे 1000 मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. उबाठा व भाजपा उमेदवारांचा त्यांनी दारुण पराभव केला. त्याबरोबरच शिवसेनेचे 10 नगरसेवकही विजयी झाले आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखे समोर जल्लोष करण्यात आला.










