खोडदे येथे माघी गणेशोत्सवा निमित्त जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा

 

गजानन प्रासादिक भजन मंडळ खोडदे गणेशवाडी यांचे आयोजन

आबलोली (वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील खोडदे गणेशवाडी येथे प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी माघी गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार असून दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी गजानन प्रसादिक भजन मंडळ खोडदे, गणेशवाडी या मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 11,111/- रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 7,777 /- रुपये व आकर्षक चषक तसेच तृतीय क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 5, 555/- रुपये व आकर्षक चषक मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.तरी नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख 11 जानेवारी 2026 असून नाव नोंदणीसाठी गणेश साळवी मो. नं. 7887447001/9404760567,संजय साळवी मो. नं. 9702987778,राजेंद्र चव्हाण मो. नं. 9403098719 यांचेशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी. तसेच या जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धांमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन गणेशवाडी ग्रामस्थांच्या वतीने गजानन प्रासादिक भजन मंडळ खोडदे गणेशवाडी या मंडळाचे अध्यक्ष संदीप साळवी यांनी केले आहे.