शिरगाव हायस्कूलच्या १९९५–९६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा २८ रोजी गेट-टुगेदर

शिरगाव(प्रतिनिधी)    देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता दहावी (सन १९९५–९६) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर सोहळा रविवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शिरगाव हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ३० वर्षांपूर्वी एकत्र अनुभवलेल्या शालेय जीवनातील अनमोल क्षणांना उजाळा देण्यासाठी तसेच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ग्रुप अ‍ॅडमिन संतोष जंगले, पूनम साटम, सुनील सावंत, विजय घाडी, पूनम कुबडे व प्रफुल्ल घाडी यांच्याशी संपर्क साधावा.