संकेत घाग यांच्या प्रभानवल्ली पं. स. गणातील जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित

लांजा (प्रतिनिधी): भाजपाचे तालुका मंडळ कार्यकारणी सदस्य असलेल्या संकेत घाग यांच्या प्रभानवल्ली पंचायत समिती गणातील भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी थाटात संपन्न झाले.‌
संकेत घाग हे भाजपाचे सक्रिय पदाधिकारी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत. याशिवाय सालपे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.‌ प्रभानवल्ली पंचायत समिती गणातील अनेक विकास कामे ते स्वखर्चाने मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने दाभोळे वाटुळ मार्गावर ओझर सालपे फाटा या ठिकाणी संकेत घाग यांनी भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्य सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी मोठ्या थाटात पार पडले. प्रभानवल्ली पंचायत समिती गणात भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी या कार्यालयाचा निश्चितच उपयोग होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव महिला शिल्पाताई मराठे
रत्नागिरी जिल्हा सचिव अमित केतकर, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा मंदार खंडकर, माजी तालुका अध्यक्ष विजय कुरूप, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव, श्री.
राणे, श्री. सावंत, जिल्हा पदाधिकारी श्रीकृष्ण हेगीष्टे,
विभाग अध्यक्ष भरत कोळवणकर, केळवली बूथ अध्यक्ष चंद्रकांत कोटकर, केळवली महिला बूथ अध्यक्ष वैशाली वसंत कोटकर ,शिपोशी बुथ अध्यक्ष बाईंग, पंचायत समिती प्रभानवल्ली गणातील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यासाठी बाबू धावडे यांचं विशेष सहकार्य लाभलं .
उपस्थित मान्यवरांनी संकेत घाग यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात आलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तसेच संकेत घाग यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना राम रक्षा हनुमान चालीसा मारुती स्तोत्र यांची पुस्तक वाटण्यात आली.