पोलिसांची ठेकेदाराविरुद्ध दाखल केली तक्रार
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहर परिसरात उभारण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची देखभाल व इतर कामकाजाची पूर्तता करणे बंधकारक असते. परंतू ही देखभाल दुरुस्ती त्या कंपनीकडून करण्यात आलेली नाही. या कामांच्या अटी व शर्थी भंग करणाऱ्या कंपनी संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल 43 लाख 35 हजारांची शासनाची फसवणूक झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक 17 जानेवारी 2023 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात आली आहे. हेमंत गोपाळ थवानी आणि कुलदीप एराम अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात पोलिस अधिक्षक कार्यालयातील पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील पोलिस निरीक्षक उमेश आव्हाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे अत्यंत महत्त्वाचे ‘रत्नागिरी सिटी सर्विलन्स प्रोजेक्ट’ अंतर्गत रत्नागिरी शहर परिसरात उभारण्यात आलेल्या सीसीटिव्हि कॅमेरे यांची देखभाल करणे, पुरवठा आदेशाप्रमाणे कामकाजाची पूर्तता करणे बंधनकारक होते. तरीही ‘प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड’ चे संचालक हेमंत थवानी व कुलदीप एराम यांना या गोष्टीची जाणीव असतानाही त्यांनी अटी व शर्थींचा भंग करुन शासनाची एकूण 43 लाख 35 हजारांची फसवणूक केली. त्यांनी हे सीसीटिव्ही कॅमेरे बंद ठेवून शासकिस कामात अडथळा निर्माण केला होता. संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(2),318(3),221,223 प्रमाणे गुनहा दाखल करण्यात आला आहे.











