मसुरे देउळवाडा मठवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरास जीवदान!

मसुरे | झुंजार पेडणेकर

मसुरे देउळवाडा मठवाडी येथील प्रकाश सांडव यांच्या परस बागेतील कुंपणास लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुदर्शन पुरी यांना सदर खवले मांजर जाळ्यात अडकलेले दिसून आले. त्यांनी त्वरित प्रकाश साळवी यांना या घटनेची माहिती दिली. विशाखा पुरी यांनी मालवणचे वनपाल सदानंद परब यांना कळविल्या नंतर वनरक्षक दिवाकर बांबर्डेकर यांनी वनविभागाच्या टीमसह दाखल झाले. प्रकाश साळवी, सुदर्शन पुरी, विशाखा पुरी, अंकित साळवी, शुभम मेस्त्री, तन्मय मेस्त्री यांनी वनविभागाला सहकार्य केले. वनरक्षक दिवाकर बांबर्डेकर यांनी जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराचीं सुटका केली.