चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची खेळाडू संस्कृती घोरथळे महाराष्ट्र संघात

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची खेळाडू संस्कृती विलास घोरथळे सध्या राहणार पाथर्डी हिची महाराष्ट्र क्रिकेटमध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या संघात निवड झाली आहे.
संस्कृती हिने लहानपणापासून चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दशरथ दाभोळकर अध्यक्ष कार्यकाळात व क्रिकेट प्रशिक्षक उदय काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले. दोन वर्षांपूर्वी संस्कृतीच्या वडिलांचे नगर जिल्ह्यामध्ये बदली झाल्यामुळे संस्कृती सध्या तेथून खेळत आहे. मात्र चिपळूण मधील क्रिकेटमुळे आपल्याला बाळकडू मिळाले यामुळेच इथपर्यंत आपण मजल मारू शकलो अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील तिने दिली आहे.
याबद्दल संस्कृतीचे तसेच चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि प्रशिक्षक उदय काणेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेट प्रशिक्षण उदय काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक उदयन्मुख युवा खेळाडू क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत.त्यांना नेहमीच विविध प्रकारची मार्गदर्शन शिबिरे,क्रिकेट सामने आणि क्रिकेटसाठी इतर पूरक अशा प्रकारचे ज्ञान नेहमीच दिले जाते.यामुळे या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक युवा क्रिकेटपटू घडविण्याचे कार्य सुरू आहे. भविष्यामध्ये येथून देश पातळीवरील खेळाडू घडतील अशा प्रकारच्या आशावाद देखील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.