*चिपळूण:- (वार्ताहर )
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय टेनिक्वाईड (रिंगटेनिस ) स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मधील
14 वर्षे वयोगटांमध्ये मुली अंतिम सामन्यात विजयी झाला.
या संघात
अनन्या गिरकर, तन्वी साळवी , श्रावणी हळदे, समृद्धी देर्देकर या विद्यार्थिनींचा समावेश होता . या मुलांनी माखजन हायूस्कूल च्या मुलीचा परभव करून अंतिम सामन्यात विजय मिळवला व त्यांची निवड विभागिय स्पर्धेसाठी झालेली आहे . तर
19 वर्षे वयोगटामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत व्दितीय क्रमांक .
या संघामध्ये इशिका आग्रे, आरोही शिंदे, पौर्णिमा जाधव, मीरा होलेकर यांचा समावेश होता
विजयी संघाला क्रीडा अधिकारी श्री सचिन मांडवकर सरांनी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमुख श्री समीर कालेकर सर व माजी विद्यार्थी निखिल वारके यांचे मार्गदर्शन लाभले तर व्यवस्थापक म्हणून कु . निकीता लब्धे मॅडम यांनी काम केले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.विभाकर वाचासिद्ध सर उपमुख्याध्यापक श्री .संजय बनसोडे पर्यवेक्षिका सौ . रेवती कारदगे तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ , त्याचबरोबर चिपळूण शहरातील नागरीक व पालकांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.













