मंडणगड नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक पदी नरेश बैकर यांची नियुक्ती

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक पदी माजी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे उपशहर प्रमुख नरेश सदानंद बैकर यांची निवड झाली आहे. स्विकृत नगरसेवक प्रविण जाधव यांनी राजामीमा दिल्याने सेनेच्या कोट्यातील हे पद रिक्त झाले होते. रिक्त जागी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरात सेनेचे उत्तम काम करणारे नैरश बैकर यांची वर्णी लागली आहे. प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात 19 जुलै 2023 रोजी निवडीची प्रक्रीया राबवण्यात आली. यावेळी विरोधी गटनेते विनोद जाधव, नगरसवेक आदेश मर्चंडे, योगेश जाधव, मुश्ताक दाभिळकर, निलेश सापटे, नगरसेविका वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, सेजल गोवळे व शहर शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.