मंडणगड : प्रतिनिधी
मंडणगड बाजारपेठेतील एका दुकानातून 3 हजार 520 रुपये किंमतीच्या तंबाखूची 31 पाकिटे पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास करण्यात आली.
शशिकांत नामदेव कपडेकर (56,रा.भिंगळोली दापोली फाटा हॉटेल मंडणगड ढाब्यासमोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल अमित बाळासो भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयिताने आपल्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात महाराष्ट्र राज्य शासनाने जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून अधिसूचनेव्दारे प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू बेकायदेशिरपणे आपल्या ताब्यात विक्रीसाठी बाळगलेला होता. याप्रकरणी अधिक तपास मंडणगड पोलिस करत आहेत.












