गोकुळ संचालक राजेंद्र मोरे यांचे निधन

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

राधानगरी: गोकुळ दूध संघ व बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र कृष्णाजी मोरे तथा आर.के.मोरे (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या आकस्मित निधनाने राधानगरी तालुक्यासह सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ बंधू विजयसिंह मोरे यांच्या निधनानंतर मोरे गटाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.

आर.के.मोरे हे सहकार चळवळीत सक्रीय होते.गोकुळ दूध संघ आणि बिद्री कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व सभासदांच्या हितासाठी मोलाचे योगदान दिले.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासात्मक उपक्रम राबविण्यात आले.

त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.अंत्यात्रेला जिल्ह्यातील सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.