आ. निलेश राणे यांनी केले संजू परब यांचे अभिनंदन

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नगरसेवक पदासाठी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. सोमवारी संजू परब यांनी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी संजू परब यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील सामाजिक तसेच विकासात्मक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
संजू परब यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, भूषण सारंग यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.