रत्नागिरी ,दिनांक २६ डिसेंबर-भारत शिक्षण मंडळ संचलित, पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला कै .सौ. विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना)गांधी वाणिज्य व श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह श्री. धनेश रायकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी (नगर परिषद, रत्नागिरी) मा.श्री.सुधाकर मुरकुटे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक श्री. रुपेश पंगेरकर ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षिका श्रीमती वर्षा जोशी ,क्रीडा शिक्षक श्री. दत्तात्रय मांजरेकर ,श्रीमती शुभांगी शिंदे,श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी ,श्रीमती निष्ठा कनगुटकर, श्रीमती शलाका वर्तक, श्रीमती शितल रोकडे ,श्रीमती मानसी चव्हाण, श्रीमती मालन तांबोळी ,श्रीमती शबनम तहसीलदार , श्रीमती कल्पना नागवेकर,श्री. तानाजी वाघमारे, श्रीमती योगिनी भागवत ,श्रीमती वृंदाली गुरव आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होता . मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन वप्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी केले. श्रीमती वर्षा जोशी यांनी मान्यवर पाहुण्यांचा परिचय करून दिला. सांस्कृतिक प्रमुख श्रीमती शुभांगी शिंदे मॅडम यांच्या हस्ते सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. श्री सुधाकर मुरकुटे यांनी आपल्या अतिथी मनोगतामध्ये सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्यातील कलागुणांना विद्यार्थ्यांना जोपासता आले पाहिजे व त्यासाठी सतत मेहनत, सराव व चिकाटी असणे अत्यंत गरजेचे आहे. असे ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह श्री. धनेश रायकर यांनी शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे केंद्रस्थान विद्यार्थी असून त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. हेच नेतृत्व भविष्यात मोठे योगदान देते असे ते म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमती शुभांगी शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मानसी चव्हाण यांनी केले. वैयक्तिक सांघिक नृत्य, गरबा,जाखडी,नाटक,गीतगायन, रिमिक्स इत्यादी गाण्यावर मुले थिरकली. अतिशय उत्साही व आनंदी वातावरणामध्ये नाटेकर, गांधी, कीर कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व आनंदात पार पडले.











