राजापूर प्रतिनिधी :तालुक्यातील सोलगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे अभिजित गुरव यांनी स्वागत केले व या सगळया कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये योग्य तो सन्मान केला जाईल अशी ग्वाही दिली.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून आंम्ही सर्व ग्रामस्थ भाजपा मध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. या प्रवेशकर्त्यांमध्ये सोलगाव येथील रोहिदास गुरव , प्रकाश गुरव, अनिल गुरव ,विकास गुरव यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहिर प्रवेश केला. यावेळी अभिजित गुरव यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भविष्यात शासनाच्या माध्यमातुन सोलगावातील सार्वजनिक हिताच्या प्रश्नांना आपण न्याय देऊ अशी ग्वाहीही यावेळी गुरव यांनी दिली.
या प्रवेश कार्यक्रम प्रसंगी कोदवली ग्रामपंचायत सदस्य अशोक गुरव, तालुका सरचिटणीस संदेश विचारे, शशी गुरव, विनायक दीक्षित आदी उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या सोलगावातील शेकडो कार्यकर्त्यांचा उपसभापती अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश













