फोंडाघाट/ कुमार नाडकर्णी– अ.वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी या प्रशाले मध्ये “इनसाईट कॉम्प्युटर फोंडाघाट” चे प्रमुख श्री. प्रशांत वंजुळे यांच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी AI (artificial intelegency) या बाबत मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. श्री. प्रशांत वंजुळे आणि त्याचे सहकारी श्री. पृथ्वीराज चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.राजम सर यांनी या मार्गदर्शकांचे मनापासून स्वागत आणि घोणसरी हायस्कूलची या महत्त्वाच्या विषयाच्या मार्गदर्शनासाठी निवड केली त्याबद्दल आभार व्यक्त केले.
श्री. वंजुळे यांनी विद्यार्थ्यांना विविध एआय टूल्स ची माहिती देताना जेमिनी, gamma, Canva, Suno app, chatgpt या सारख्या महत्त्वाच्या AI टूल्स चा उपयोग आपल्या दैनंदिन अध्यापनात कसा होतो याचे अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक रूपात सादरीकरण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये विविध स्पर्धा देत असताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा व भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी बौद्धिक सामर्थ्याने पुढील जीवनात AI च्या मदतीने यशस्वी वाटचाल करावी यासाठी सदर मार्गदर्शन असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली.या मार्गदर्शनातून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच आत्मविश्वास प्राप्त झाला आणि यातून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असे प्रशालेची विद्यार्थिनी कु. पार्थिवी एकावडे हिने आपल्या मनोगतून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सर्व मार्गदर्शक उपस्थितांचे आभार श्री.राजम सर यांनी व्यक्त केले.










