​दापोलीत दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली:
दापोली शहरातील कामगार गल्ली येथील एका दुकानासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सचिन अशोक कांगणे (वय ३६, रा. वणंद कांगणेवाडी, ता. दापोली) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कांगणे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेली काळ्या रंगाची ‘हिरो होंडा स्लेंडर प्लस’ (क्र. एम. एच. ०८ यु. ०५७४) ही दुचाकी २९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री २१:०० वाजता कामगार गल्लीतील ‘खुशी फॅशन’ दुकानासमोर उभी केली होती. ३० डिसेंबरच्या सकाळी ०९:०० वाजेच्या दरम्यान त्यांनी पाहिले असता, तिथे लावलेली दुचाकी दिसून आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायद्यासाठी ही १२,००० रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे.
​या घटनेची नोंद ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री २२:३९ वाजता दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरीला गेलेली दुचाकी २००९ चे मॉडेल असून तिचा चेसिस नंबर MBLHA10EE9 HK53224 असा आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.