राजापूर (प्रतिनिधी): शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा सुपुत्र अमान गनी खतीब (२१) याचा कणकवली फोंडा येथे झालेल्या दुचाकी अपघातात दुदैवी मृत्यु झाला आहे. बुधवारी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान महामार्गावर फोंडा उंबरट फाटयावर हा अपघात झाला. अमान याच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
अमान खतीब हा बुधवारी सकाळी कामानिमित्त आपली दुचाकी घेवून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीकडून राजापूरकडे परतत असताना त्याची फोंडा उंबरट फाटा येथे ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची खबर मिळताच राजापूर शहरातील अनेक व्यापारी व अमान याच्या मित्र परिवाराने कणकवलीकडे धाव घेतली.
अमान याच्या अपघाती मृत्युमुळे खतीब कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होय.
————————————————————-











