मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे हे आज ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्री. तावडे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. प्रदिप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग उपसचिव कि. म. जकाते यांनी काढले आहेत.












