शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
अमित खोत | मालवण : महान गावात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांची भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आली.
महान मुख्य रस्ता ते टेंबवाडी जोडणारा रस्ता खाडीकरण डांबरीकरण करणे, मुख्य रस्ता ते सावरीकडे जाणारी पाणंद पायावाट तयार करणे, वरचावाडा प्रकाश परब ते प्रकाश ईळकर घराकडे जाणारी पायवाट तयार करणे, मुख्यरस्ता ते विश्राम शिंदे घराकडे जाणारी पायवाट तयार करणे, चंद्रसेन साळुंखे घर ते स्मशान रस्ता तयार करणे, पुर्ण प्राथमिक शाळा महान दुरुस्त करणे. आदी मंजूर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, माजी सभापती सुधीर साळसकर, शिवसेना विभागप्रमुख संतोष पालव, शाखाप्रमुख संतोष घाडी, उपशाखा प्रमुख रंजन घाडी, तालुका सचिव माजी सरपंच सुहास साळुंखे, सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, माजी सरपंच मदन घाडी, माजी सरपंच सीताबाई महानकर, ग्राप सदस्य प्रसाद जाधव, सागर शिंदे, अंजली हळवे, चैताली शिंदे, जेष्ठ सल्लगार सुनील हळवे, रविंद्र साळसकर, अशोक जाधव, मंगेश साळसकर, संदीप राणे, माजी पोलीस पाटील दाजी राणे, संतोष शिंदे, बाळा हळवे, अजय तावडे, नीता चव्हाण, शंकर हळवे, अक्षय जाधव, निळकंठ घाडी, दिपक घाडी, दिनेश घाडी, राजू घाडी, राजेंद्र घाडी, मंदार हळवे, संदीप शिंदे, अशोक गावडे, राजन गावडे, मंदार शिंदे, महेश शिंदे, दिलीप हळवे, मिथुन हळवे, विष्णु शिंदे यांसह अन्य ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.












