पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासनपूर्ती!

▪️मुणगे येथे हायमास्ट दिवा आणि ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.

मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे भगवती मंदिर नजिक सोलर हायमास्ट चे उद्घाटन भारतीय जनता पार्टी देवगडचे उपाध्यक्ष गोविंद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर ठिकाणी हायमास्ट दिव्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या जवळ केली होती. मंत्री नितेश राणे यांनी तातडीने दखल घेत जत्रोत्सवापूर्वी सदर ठिकाणी सोलर हायमास्ट दिवा उभारण्याचे आदेश दिले होते. यावेळी बुथ अध्यक्ष निषाद परूळेकर, भगवती देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, पुरूषोत्तम तेली, सुनिल घाडी, देवस्थान कमिटी सदस्य प्रकाश सावंत, रामतीर्थ कारेकर, मनोहर मुणगेकर आणि शिल्पा राऊळ मॅडम अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुणगे ग्रामस्थांकडून पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे श्री भगवती देवस्थान कमिटी मुणगेच्या मागणी नुसार भगवती देवस्थानला नवीन ट्रान्सफारमर डि पी मंजूर करत त्याचे उदघाट्नही नुकतेच करण्यात आले.

श्री देवी भगवती जत्रोत्सव पाच दिवस असल्याने रोषणाई खुप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी स्वतंत्र डि पी मागणी मंत्रीमहोदय नितेश राणे यांच्या कडे श्री भगवती देवस्थान कमिटीने केली होती. पालकमंत्री नितेश राणे यानी दिलेला शब्द पुरा केल्याने आभार मानण्यात आले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, भगवती देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. वारंवार भगवती देवस्थान कमिटी च्या पदाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर डि पी चे काम मार्गी लागले. सर्व ग्रामस्थांनी मंत्रीमहोदय यांचे आभार मानले आहेत.