लांजा (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल लांजामध्ये आयोजित पहिल्या टप्प्यातील (इ. ५ ते ७) क्रीडा स्पर्धेत मुलांमध्ये सातवी ब संघ विजयी तर मुलींच्या
डाॅजबाॅल स्पर्धेत सातवी अ मुलींनी बाजी मारली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकसित व्हावेत आणि त्यातून भविष्यात एखादा खेळाडू निर्माण होवून त्याने आपल्या शाळेचे आणि पर्यायाने तालुक्याचे नाव रोशन करावे , या उदात्त हेतूने या क्रिकेट व अन्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील पाटोळे, उपमुख्याध्यापक वसंत आजगावकर, पर्यवेक्षक मंगेश वाघाटे,सहा.पर्यवेक्षक तसेच ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या पहिल्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे विविध खेळांचे सामने घेण्यात आले.पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्कल क्रिकेट चे सामने घेण्यात आले.यामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सातवी ब संघ विजेता तर सहावी अ चा संघ उपविजेता बनला.
तसेच पाचवी ते सातवी च्या विद्यार्थीनींसाठी डाॅजबाॅल च्या सामन्याचे आयोजन केले होते.यामध्ये अंतिम सामन्यात दोन्ही वर्गाच्या मुलींनी अत्यंत चुरशीने खेळ खेळला परंतु सामन्याच्या अंतिम क्षणात सातवी अ मुलींनी बाजी मारुन विजेतेपद पटकावले तर सहावी अ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.













